ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
राज्यात आता तिसरीपासून परीक्षा ; पुढील वर्षापासून ‘केरळ पॅटर्न’ सुरु.

राज्यात आता तिसरीपासून परीक्षा ; पुढील वर्षापासून ‘केरळ पॅटर्न’ सुरु.

प्रकाशन: 22 Nov 2022 11:40 AM
वाचन संख्या 61

ब्यूरो न्यूज : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार राज्यात आता शिक्षणाचा ‘केरळ पॅटर्न’ राबविणार आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील.
राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात पाठविले जात आहे. काही खासगी शाळा वगळता सरकारी शाळांमध्ये परीक्षा घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थांमध्ये अभ्यासाची गोडी राहिली नाही. नापास होणारच नाही; तर अभ्यास कशासाठी करायचा, अशी मानसिकता तयार झाल्यामुळे त्यांचे वाचनही कमी झाले आहे. भविष्यातील धोका लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी राजस्थान, गुजरात आणि केरळमधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करत आहेत .
राज्य शिक्षण संचालक कैलास पगारे म्हणाले, महाराष्ट्रात ८ वी पर्यंतच्या परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत; पण शेजारच्या राजस्थानमध्ये ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डामार्फत परीक्षा घेतल्या जात आहेत. तर गेल्या वीस वर्षांपासून पंजाबमध्ये परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची बँक आहे. केरळमध्येही इंग्रजी शिक्षणासाठी खासगी शिक्षण संस्थांना पसंती दिली जाते. इंग्रजीसह स्थानिक भाषेमधून शिक्षण घेण्याचे प्रमाण अधिक आहे; पण तितकाच विश्वास सरकारी शिक्षणावरही आहे. त्यामुळे तेथील प्राथमिक विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत आघाडीवर आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स