ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांची मालवण न.प.प्रशासनाला लेखी सूचना.

माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांची मालवण न.प.प्रशासनाला लेखी सूचना.

प्रकाशन: 21 Nov 2022 07:57 PM
वाचन संख्या 267

भाजपाचे उमदे नेतृत्व सौरभ ताम्हणकर यांनी प्रत्यक्ष दखल घेत वेधले होते लक्ष..!

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर बाजारपेठ दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्त्याच्या रखडलेल्या गटाराचे बांधकाम तातडीने सुरु करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात यावेत, अशी लेखी सूचना भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांनी मालवण नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना केली आहे.
या प्रश्नाकडे भाजपचे मालवण शहरातील युवा नेतृत्व सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी निलेश राणेंचे लक्ष वेधले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील माहिती देण्यात आली आहे.

मालवण बाजारपेठ दलित वस्ती चर्मकार वसाहत येथील रस्त्याच्या या गटारासाठी नगरपरिषदेकडून २८ लाख एवढ्या निधीची तरतूद करून निविदा प्रक्रिया करण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश देऊनही अद्याप हे काम सुरू झालेले नाही. चर्मकार वसाहतीची मागणी आणि त्याची समस्या पहाता हे काम तातडीने पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सदर कामासाठी नियुक्त केलेला ठेकेदार हा वेळकाढूपणाच्या धोरणाचा अवलंब करत आहे. आज निधीची उपलब्धता असूनही केवळ ठेकेदारामुळेच या कामाला विलंब होत आहे. याचा त्रास चर्मकार वसाहतीला सहन करावा लागत आहे. तरी सदरील विषयाचा आपण गांभीर्याने विचार करून मालवण दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्ता गटाराचे बांधकाम त्वरित सुरू करण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश द्यावेत आणि हे काम योग्य तो दर्जा राखून वेळेत पूर्ण व्हावे याची दक्षता घ्यावी, असे निलेश राणे यांनी या लेखी पत्रात म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स