ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियान अंतर्गत सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुवळे, कोळोशी, शिरगांव प्रशालेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियान अंतर्गत सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुवळे, कोळोशी, शिरगांव प्रशालेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन.

प्रकाशन: 21 Nov 2022 03:10 PM
वाचन संख्या 67

प्रत्येक कृती राष्ट्र हिताची आणि विश्वशांतीची .


संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियानांतर्गत सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शैक्षणिक उपक्रमा द्वारे दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी कुवळे प्रशाला, कोळोशी हडपिड आणि शिरगाव हायस्कूल व महाविद्यालय येथील शाळेतील विद्यार्थी व पालक यांना जीवन विद्येच्या तत्व ज्ञानावर आधारित शिल्पकार या कोर्सचे सौ श्रध्दा गणेश राणे यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्गाला UPSC, MPSC, BANKING, STAFF SELECTION , MELEITARY च्या स्पर्धा परीक्षांचे अचूक करियर मार्गदर्शन करणारे नामांकित मार्गदर्शक सुहास सीताराम पाटील यांचे व्याख्यान झाले तसेच मुख्याध्यापक श्री प्रमोद लोके सर सौ अश्विनी गर्जे यांचे मोलाचे सहकार्य लाभले
सरस्वती विद्या मंदिर कुवळे शाळा क्रमांक १ कुवळे या ठिकाणीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाले मुख्याध्यापक विष्णू परब सर श्री शंकर भुजबळ सर.व श्री साटम सर.यांचे मोलाचे सहकार्य लाभले
दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी शिरगाव महाविद्यालय शाळा व महाविद्यालयातील .३०० विद्यार्थां२०२२ना . सुहास पाटील आणि सौ श्रध्दा राणे यांनी जीवन विद्येचे मार्गदर्शन केले व ते विद्यार्थांना खूपच भावले यामध्ये जीवन विद्या मिशन परिवारातर्फे चंद्रकांत घाडी, मोहन कदम, श्री अमोल पांचाळ, प्रकाश पांचाळ आणि जीवन विद्या मिशन परिवाराच्या कोर्स कोऑर्डीनेटर सौ नेहा मोहिते व शिवानी मोहिते हिने आपल्या सुंदर निवेदना द्वारे विद्यार्थांना जीवन विद्येची ओळख करून दिली अशा पद्धतीने जोगेश्वरी शाखेतील वरील नामधारक यांनी सुंदर असा उपक्रम राबवला

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स