ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
असरोंडी गावातील तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

असरोंडी गावातील तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

प्रकाशन: 21 Nov 2022 01:50 PM
वाचन संख्या 45

शिवबंधन बांधून आमदार वैभव नाईक यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत.

कणकवली | प्रतिनिधी :
१८ डिसेंबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील भाजपचे कार्यकर्ते व माजी सरपंच श्री. दिलीप (छोटू) गावकर यांच्यासह अनेक तरूणांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.कणकवली विजय भवन येथे आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (भाऊ )सावंत, शाखा प्रमुख सुनील सावंत, युवा शाखा प्रमुख ऋषिकेश सावंत, जेष्ठ शिवसैनिक मोहन परब, संतोष सावंत, बबलू परब उपस्थित होते.

असरोंडी गावात मागील पंचवीस वर्षे भाजपची एक हाती सत्ता असून देखील गावाचा विकास न करता फक्त स्वतःच्या विकासावर भर देण्याचे काम आता पर्यंत भाजप पदाधिकारी तसेच सध्याचे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोप या प्रवेश कर्त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून असरोंडी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा प्रवेश केल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन सुशिक्षित चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यामध्ये असरोंडी भाजप कार्यकर्ते आणि माजी सरपंच दिलीप (छोटू) गावाकर यांच्यासह अनंत पोईपकर,अजय गावडे, आदित्य सावंत, प्रमोद सावंत, दयानंद कदम, प्रतीक सावंत,अमोल गावडे, अमित गावडे, संतोष सावंत, प्रतीक परब, गौरव धुरी, काशीनाथ धुरी, संदीप सावंत, अजित परब, सौरभ बागवे, तुषार चव्हाण, भालचंद्र सावंत, मनीष सावंत, सचिन सावंत, रोषण गावडे, सर्वेश सावंत,विनायक सावंत,मयूर घाडी गावकर, प्रियेश घाडीगावकर, कृष्णा जंगले, बाबू कोकरे, विश्वनाथ आंबेरकर आदी कार्यकर्त्यांनी एकजुटीने शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असरोंडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थीपणे झटण्याची शपथ सर्वांनी घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स