ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे २९ नेमबाज राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे २९ नेमबाज राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र..!

प्रकाशन: 21 Nov 2022 12:55 PM
वाचन संख्या 48

मसुरे | प्रतिनिधी :
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २१ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत भोपाळ आणि त्रिंवेंद्रम येथे होणार आहे. या स्पर्धेत विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे संकुलाचे २९ नेमबाज पात्र ठरले आहेत.


या संकुलाचा नेमबाज निमेश शरद जाधव याची महाराष्ट्र संघात वरिष्ठ आणि कनिष्ठ वयोगटातील (ISSF & civilian) गटात निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेमबाजी रेंज- प्रबोधनकार ठाकरे 10 मीटर एअर रायफल आणि पिस्तूल नेमबाजी रेंज, याचे व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती-अध्यक्ष श्री अरविंद प्रभू आणि सचिव डॉ. मोहन राणे करतात. शूटिंग रेंजमध्ये अप्रतिम प्रशिक्षण सुविधा आणि प्रशिक्षकांचा संघ आहे. ज्यात मानसशास्त्रज्ञ, नेमबाजी तांत्रिक प्रशिक्षक, पोषणतज्ज्ञ आणि फिटनेस प्रशिक्षक यांचा समावेश आहे. ज्यामुळे ही शूटिंग रेंज महाराष्ट्रातील सर्वोत्तम शूटिंग रेंजपैकी एक आहे. 2024 ऑलिम्पिकसाठी कोटा जिंकणारा रुद्रांक्ष पाटील आणि 2022 च्या डेफ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी नताशा जोशी यांसारखे चॅम्पियन बनवण्याचा इतिहास या शूटिंग रेंजमध्ये आहे. याशिवाय या शूटिंग रेंजने अनेक राष्ट्रीय आणि राज्य चॅम्पियन तयार केले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स