ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
…..आणि आम्ही देव पाहिला..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

…..आणि आम्ही देव पाहिला..!

प्रकाशन: 19 Nov 2022 09:52 PM
वाचन संख्या 138

ओरोस येथील डॉ. सुशीलकुमार परब यांचे रहस्यमय प्रवास वर्णन.

मसुरे | प्रतिनिधी :
कमळगड ट्रेक मध्ये आलेला अनुभव डॉ. परब यांच्या शब्दात…….
ठरल्या प्रमाणे 12 नोव्हेंबर 2022 ला रात्री कमळगडच्या पायथ्याशी तुपे वाडी वाई ( सातारा पासून 30 किमी ) गावात पोचून धोम धरण परिसरात तंबू मध्ये मुक्काम केला. खरतर 5 जण जायच ठरल होत पण ऐनवेळी 3 जणं रद्द झाल्याने मी आणि माझा मित्र डॉ अनिल शेळके (मिरज) दोघे च होतो. नेहमीप्रमाणे आम्ही गड आणि गड परिसराचा अभ्यास करूनच गेलो होतो. कमळगड आणि केंजाळ गड एका दिवसात करायचे ह्या उद्देशाने आम्ही तुपे वाडी मध्ये मुक्काम केला होता.

थंडीत तंबूमध्ये छान झोप झाल्यावर सकाळी फ्रेश होऊन 7 वाजता आम्ही गड चढायला सुरवात केली, साधारण अर्धा तास चालल्यावर बोलण्याच्या नादात एका ठिकाणी 2 वाटा फुटतात तिथे आम्ही डावीकडे वळायचे सोडून उजवीकडे वळलो , इथेच नकळत सुरू झाला आमचा चुकीच्या दिशेने प्रवास.
पाच दहा मिनिटां चि वाट चालल्यावर आमच्या लक्षात आले की आपन बहुतेक चुकलोय पण वाट दिसतेय ह्याचा अर्थ गड पुढे च असणार म्हणून आम्ही काहीसे पुढे चालत राहिलो.
आम्ही उत्तर दिशेला तोंड करून चालत होतो पण गड नेमका दक्षिण दिशेला आमच्या पाठीमागे होता, पण आम्ही थोड्या श्या झाडीत असल्यामुळे दिसत नव्हता , ज्या दिशेने आम्ही चाललो होतो तो पण एक उंच कडा च होता हाच गड असावा म्हणून आम्ही वाट नसताना सुद्धा पावसाळ्यात वाढणार्‍या उंच झाडांमध्ये प्रवेश केला. कदाचित हा चढ चढल्यावर वर मोकळ पठार असेल आणि तिथून गडावर जायची वाट नक्की सापडेल ,किमान 100 -150 मीटर उंच कडा 80–85 डिग्री स्लोप त्या बारीक कारवि च्या झाडांचा आधार घेत घेत चढत होतो , उंच खडा स्लोप असल्या मुळे चढताना त्रास होत होता पाय घसरत होते मागच्या मागे तोल जायचा, एक दोन वेळा पाय घसरून खाली जातोय की काय असे वाटले पण सावरलो .पायात गोळे आलेत म्हणून बसायची सोय नव्हती.
हा खडतर चढाव चढून झाल्यावर एक छोटी शि पण पुसटशी आडवि वाट होती तिथे थोडी विश्रांती घेतल्यानंतर हीच ती गडाकडे जाणारी वाट ह्या आविर्भावात आम्ही त्या वाटेने पुढे चालू लागलो. एव्हाना आम्ही कारवि च्या छोट्या झाडांमधून गर्द जंगलात प्रवेश केला होता दाट उंच झाडे आणि गर्द सावली मुळे आम्हाला चारही दिशांचे सर्व काही दिसण बंद झाले होते
पुसटशी वाट दिसायची पण काही अंतर चालल्यावर बंद व्हायची प्राण्यांची पावलट दिसायची गुरांची असल्यासारखी ( पन ती जंगली प्राण्यांची असल्याचे नंतर कळले) जिकडे जाईल त्या दिशेला फक्त घनदाट जंगल दिसायचे उजवीकडे डावीकडे वर च्या दिशेने आम्ही जात होतो पण मोकळी जागा किंवा पठार कुठे च येत नव्हत गड कोणत्या दिशेला आहे काहीच कळत नव्हते GPS(Google earth) मध्ये चालायच मध्ये च बंद पडायच काही वेळा तर ते गड अगदी 10 — 20 मीटर वर असल्याच दाखवायच , पण त्या दिशेने चालायला लागल्यावर ते वेगळीकडे च दाखवायच .

असे किमान 2 -3 तास फिरल्यावर आमच्या लक्षात आल की ह्या जंगलात आपन पुरते फसलोय याची जाणीव आम्हाला झाली आणि मनाची घालमेल सुरू झाली, प्राण्यांचे आवाज आणि अस्तित्व जाणवू लागल, काही आवाज ओळखी चे तर काही चित्र विचित्र वाटायचे. 20 ते 25 रानटी माकडांचा एक मोठा कळप खूप मोठ्या ने आवाज करत आमच्या दिशेने येताना आम्हाला दिसला. एक तर त्यांना आमचा धोका वाटला किंवा कोणत्या तरी मोठ्या प्राण्याचा. खूप घाबरलो आम्ही आणि एका झाडाच्या आडोश्याला शांत बसुन राहिलो. आणि मोठ्या प्राण्यांची भीती आणखीन च वाटू लागली. एक लाकडी काठी सोडली तर आमच्याकडे
स्वसंरक्षणसाठी काहीच हत्यार नव्हते.

एव्हाना सकाळचे साडेअकरा वाजले होते आम्ही दोघेही हतबल झालो होतो एवढ्या वर्षा च्या भटकंती मध्ये आम्हाला अस कधी च झाल नव्हत. एका ठिकाणी शांत बसलो आणि एकमेकांना धीर देऊ लागलो. मनाची घालमेल वाढली होती कारण अश्याच एक दोन घटना आम्ही ऐकल्या होत्या. त्यात विसापूर गडावर भरकटलेल्या ट्रेकर चि घटना तर अगदी ताजी होती त्याला तर 24 तासानंतर हेलिकॉप्टरने rescue करण्यात आले होत अस ऐकल होत तसच आपन ह्यातून आपन संध्याकाळी पर्यंत आपन ह्यातून बाहेर पडू शकलो नाही तर ?? ह्या विचारानेच मन सुन्न झाले.
दोघांनीही देवाचे नाव घ्यायला सुरुवात केली, तेवढ्यात आम्ही एका झाडावर चढून बघायचे ठरवल की गड कुठे दिसतो का??
झाडावर चढल्यावर साधारण दोनशे मीटर वर आम्हाला एक छोटी शि मोकळी जागा दिसली आम्ही त्या मोकळ्या जागेवर जायच ठरवल निदान तिथे जाऊन कोणाला तरी हाक मारता येईल किंवा तिथून गडाचा /वाटेचा अंदाज घेता येईल म्हणून आम्ही त्या दिशेने वाट नसताना सुद्धा अडचणी दाट झाडी तून आणि गच्च जंगलातून चालायच ठरवल . इथे एका सापाने धावत दर्शन दिले.

जरास चालल्यावर आम्हाला कोणीतरी बोलण्याचा आवाज येऊ लागला आम्ही जोरजोरात हेल्प हेल्प म्हणून हाका द्यायला लागलो त्यांनी पण ओ देऊन खाली या अस सांगितल साधारण 100 मीटर त्यांच्या दिशेने खाली गेलो तिघे जण होते ते साधारण आमच्या च वयाचे त्यांनी आम्हाला विचारले इकडे काय करताय??
कमळ गड ला चाललोय म्हटलं
त्यांनी पण आश्चर्य चकित होऊन विचारले इकडे कसे आलात?? वाट चुकलाय तुम्ही.
आणि त्यांनी आम्हाला एक वाट दाखवली इथून सरळ खाली जा ही वाट सोडू नका. साधारण अर्धा तास चालल्यावर एक मोकळी जागा आली तिथून एक दरी आणि आणि पलीकडे
कमळगड दृष्टीक्षेपात आला. आम्ही दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला. आकाशाला गवसणी घालणारा एक उंच च उंच कडा जो खरा खरा कमळगड होता त्याला बघून आम्ही गुडघ्यांवर वाकून नमस्कार केला. आणि गडाच्या दिशेने आम्ही चालू लागलो जंगलातून गडावर जायला आम्हाला एक तास लागला गडावरील वातावरण दुपारी 2 च्या उन्हात सुद्धा आम्हाला मन प्रफुल्ल करणार वाटल , गड बघून झाल्यावर साधारण 3 वाजता उतरायला सुरवात केली. खाली येताना पायातील त्राण गेल होत सकाळी 7 ला चालू केलेला आमचा ट्रेक आता 4 वाजले होते 8 तास आम्ही नुसत चालत होतो. शरीर थकून गेल होत
कमळ गड करून तुपे वाडी वरुण जाता जाता केंजाळ गड करण्याचा आमचा प्लॅन वेळे अभावी अ राहिला
1.30 तास गड उतरून खाली आल्यावर आम्ही धोम धरण बॅक वॉटर मध्ये आंघोळ करायच ठरवल
अर्धा तास मनसोक्त त्या पाण्यात पोहून घेतल सकाळ पासून चा सगळा शीण गेल्यासारखं वाटले .
खूप भूक लागली होती
गाडीत बसुन आम्ही वाई च्या दिशेने निघालो .

निघता निघता मनात विचार आला आपन सकाळ पासून 5 तास त्या जंगलात फिरत होतो एक पण माणूस दिसला नाही किंवा कोणाचा आवाज पण नाही मग हे तिघेजण काय करत होते असतिल तिकडे ?? कदाचित शिकारीला आले होते असतिल.
त्याचबरोबर डोक्यात प्रकाश पडला आपन देवाचा धावा केल्यानंतर आलेली माणसं होती ती.
अर्थात देव आहे की नाही हे प्रत्येकाच्या मानण्यावर आणि श्रद्धेचा विषय आहे
पण आम्ही देव पहिला आणि अनुभवला सुद्धा !!

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स