त्रिंबक येथील ऐश्वर्या साटमचा सत्कार !
आचरा ज्यु. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
विवेक परब / आचरा : त्रिंबक बागवेवाडीतील कुमारी ऐश्वर्या प्रकाश साटम या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांना शेतीकामात मदत करत यावर्षी झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये न्यु इंग्लिश स्कुल आचराया कनिष्ठ विद्यालयामधुन कॉमर्स शाखेतून पहिला येण्याचा मान प्राप्त केला. तिच्या यशा बद्दल बागवेवाडीतील ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे यथाशक्ती मदत गोळा करून श्री प्रकाश साटम यांचे घरी जाऊन वयोवृद्ध ग्रामस्थ श्री अरुण बागवे यांचे हस्ते ७५०१ रुपयांचा धनादेश शिक्षणासाठी खारीचा वाटा म्हणुन कुमारी ऐश्वर्या प्रकाश साटम हिचे जवळ सुपूर्त केला. आणि तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सुरेंद्र सकपाळ व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.