चिंदर कुडोपी येथे पंतप्रधानांच्या वाढदिवसा निमीत्त भाजपचे ध्वजारोहन
चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ व भाजप मालवण तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर यांचा सहभाग
विवेक परब / आचरा : देशाचे यशस्वी पंतप्रधान मा नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त
भारतीय जनता पार्टी चिंदर विभाग च्या वतीने चिंदर कुडोपी रस्ता नाका येथे मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते भाजपाचे ध्वजारोहण करण्यात आले व गरजु महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी चिंदर गावचे उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य, सौ दुर्वा पडवळ,विवेक परब, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा चारकोप विधानसभा मतदारसंघ महामंत्री योगेश पडवळ, सतिश नलावडे, अनंत पडवळ,अनिल पडवळ, संतोष जाधव, अजित नार्वेकर, प्रसाद पडवळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री चिंदरकर म्हणाले, देशांचे पंतप्रधान यांनी जगामध्ये देशाचं नाव रोशन केलं आहे, त्यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत नेहमीच नरेंद्र मोदींचा आपल्याला गर्व असला पाहिजे,
उपसरपंच दिपक सुर्वे यांनी ही शुभेच्छा दिल्या,
योगेश पडवळ यांनी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात सेवा म्हणून सप्ताह साजरा होत आहे, शेतकऱ्यांसाठी किसान योजना व अश्याच प्रकारच्या कित्येक योजना देशभरात सुरू आहेत व त्याचा माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा अशी विनंती केली. सर्वांचे आभार मानुन कार्यक्रम संपविण्यात आला..
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)