ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा निमजगा येथे दिपोत्सव उत्साहात साजरा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा निमजगा येथे दिपोत्सव उत्साहात साजरा..!

प्रकाशन: 17 Nov 2022 12:53 PM
वाचन संख्या 26

बांदा | राकेश परब :
बांदा निमजगा येथिल श्री देव महापुरुष देवस्थान येथे दिपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावर्षी प्रथमच आयोजन असूनही ग्रामस्थांचा मोठा सहभाग लाभला. श्री देव महापुरुष पुजन करुन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला वंदन करुन दिपोत्सवाचा आरंभ झाला. महिलावर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवत यात सहभाग घेतला. सर्वत्र पणत्या पेटविल्यानंतर आरती व प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर “शिवरायांचे आठवावे रुप ,शिवरायांचा आठवावा प्रताप” या स्फुर्तीदायक प्रेरणामृताचे सामुहिक पठण करण्यात आले. सर्वांच्या कल्याणासाठी श्री देवमहापुरुषाला गाऱ्हाणे घालून या कार्यक्रमाची सांगता झाली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स