ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
उमेद फाऊंडेशनमुळे वंचितांची दिवाळी गोड...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

उमेद फाऊंडेशनमुळे वंचितांची दिवाळी गोड...!

प्रकाशन: 17 Nov 2022 11:42 AM
वाचन संख्या 60

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
उमेद फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २०० कुटुंबे व वृद्धाश्रम या ठिकाणी दिवाळी फराळ वाटप करून वंचितांच्या दारी दिवाळी साजरी करण्यात आली. उमेद फाउंडेशन मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २०० कुटुंबांच्या दारी उमेद फाउंडेशन च्या सदस्यांनी फराळ किट पोहोच करून वंचीतांची दिवाळी गोड केली. याशिवाय दिविजा वृद्धाश्रम असलदे, जीवदान विशेष शाळा कुडाळ व सविता आश्रम येथेही दिवाळी फराळ व कपडे यांचे वाटप करण्यात आले. उमेद मार्फत शैक्षणिक साहित्य वितरण, उमेद शिष्यवृत्ती,करियर मार्गदर्शन, जि.प.क्रीडामहोत्सवात प्रथमोपचार कीट असे विधायक कार्यक्रम राबविले जातात. मोहिम प्रमुख म्हणून प्रदीप पाटील यांनी तर समन्वयक म्हणून राजेंद्र एस पाटील यांनी काम पाहिले. या दिवाळी फराळ किट पॅकिंग व तालुकावार वितरण यासाठी सौ.शोभा पाटील, शीतल पाटील, मेघा नाळे, हांडे मॅडम, रेखा धावले, स्मितल घुगरे, सुजाता तोडकर, स्वाती पाटील, प्रेरणा पाटील,श्री प्रदीप नाळे, सागर पेंडूरकर, नितीन पाटील,स्वप्नील तोडकर, समिल घुगरे, सचिन कांबळे, जयकुमार पाटील, विजय मसुरकर, विजय भोगले, मनोज गुंजाळ, जे डी पाटील, यांनी विशेष मेहनत घेतली. ही संपूर्ण मोहीम समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणगीमुळे पूर्ण होऊ शकली तर उमेदीयन यांनी ती यशस्वी केली याबद्दल उमेद फाउंडेशनचे संस्थापक सदस्य प्रकाश गाताडे यांनी सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स