ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव हायस्कूलचे विद्यार्थी वरद गोठणकर व प्रियांका परब यांची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगांव हायस्कूलचे विद्यार्थी वरद गोठणकर व प्रियांका परब यांची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड..

प्रकाशन: 16 Nov 2022 01:38 PM
वाचन संख्या 52

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
विद्युत मंत्रालय भारत सरकारद्वारे ऊर्जा दक्षता ब्युरोच्या माध्यमातून ऊर्जा बचतीवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील वरद गोठणकर व प्रियांका परब या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी (लहान गट) आणि आठवी ते दहावी (मोठा गट) अशा दोन गटांत घेण्यात आली.
या चित्रकला स्पर्धेत शिरगांव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वरद गोठणकर (सातवी) याची लहान गटातून व प्रियांंका परब (आठवी) हिची मोठ्या गटातून या दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली आहे .राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी महाराष्ट्राातूून ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. राज्यस्तरावर विद्यार्थ्याची स्पर्धा घेऊन राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांना पाठवले जाते. याही वर्षी शिरगांव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक श्री. विनोद चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अरुण कर्ले,संस्थाचालक ,सर्व पदाधिकारी,चेअरमन, प्राचार्य एस.एन.अत्तार , पर्यवेक्षक यु.जे.रावराणे सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स