ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तिवरे वाळवेवाडी शाळेला टीव्ही संच भेट..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तिवरे वाळवेवाडी शाळेला टीव्ही संच भेट..!

प्रकाशन: 16 Nov 2022 01:22 PM
वाचन संख्या 126

मसुरे | प्रतिनिधी :
श्रीप्रतिष्ठान ठाणे यांस कडून तीवरे वाळवेवाडी या शाळेला टीव्ही प्रदान करण्यात आला. श्री.प्रतिष्ठान श्रीनगर ठाणे यांजकडून सदर 40इंची Android TV शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा कदम यांच्याजवळ प्रदान करण्यात आला.शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी हा स्मार्ट टीव्ही देण्यात आला आहे. तिवरे वाळवेवाडी शाळा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असून विद्यार्थ्यांना सुद्धा या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते याबद्दल मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक यांचे प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. श्रीप्रतिष्ठानचे विश्वस्त खजिनदार संतोष महादेव वाळवे हे तिवरे वाळवेवाडीतील ग्रामस्थ असून त्यांचं प्राथमिक शिक्षण याच गावात पूर्ण झाले आहे. या वेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त खजीनदार श्री.संतोष महादेव वाळवे उपस्थित होते, तसेच यासाठी प्रयत्न करणारे श्री.अमित प्रकाश वाळवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम.सविता गणेश वाळवे , अनिल वाळवे अनंत वाळवे,अमित वाळवे, महेश वाळवे, श्रीधर कदम, श्री प्रकाश वाळवे, श्रीमती उर्मिला वाळवे, श्री .पृथ्वीराज वाळवे, अंगणवाडी सेविका श्रीम.अनिता वाळवे,तसेच सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.नेहा कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच उपशिक्षक श्री.राजेंद्र कवडे यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स