देवगड तालुक्यात ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर…!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यामधील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच जाहिर झाल्या असून थेट सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये अनुसूचित जमाती महिलांसाठी १ व अनुसूचित जाती महिलांसाठी १ व सर्वसाधारसाठी १,ओबीसी महिलांसाठी ५, ओबीसी सर्वसाधारण ७ , सर्वसाधारण महिलांसाठी १० तर खुला प्रवर्गासाठी १३ असे सरपंच पदासाठी आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे. देवगड तालुक्यातील एकुण ७२ ग्रामपंचायतींपैकी ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. यामुळे निम्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या तालुक्यातील निवडणुका असल्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये आचार संहिता लागू करण्यात आली आहे.
विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी साठी आरक्षीत ठेवण्यात आले आहे.
आरे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला बापर्डे- सरपंच पदासाठी आरक्षण खुला प्रवर्ग, बुरंबावडे- सरपंच पदासाठी आरक्षण अनुसूचित जाती जमाती महिला, चाफेड- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,चांदोशी- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,दाभोळे- सरपंच पदासाठी आरक्षण खुला प्रवर्ग, दहिबांव- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग, गवाणे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला ,गिर्ये- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला ,गोवळ- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,हडपीड- सरपंच पदासाठी आरक्षण सर्व साधारण महिला,हिंदळे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण प्रवर्ग,कटटा- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,खुडी- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,किंजवडे- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,कोटकामते- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,कुणकवण- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,कुवळे- रेंबवली- सरपंच पदासाठी आरक्षण अनुसूचित जाती ,महाळुंगे- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,मणचे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,मिठमुंबरी- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,नाद- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,नारिंग्रे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,ओंबळ- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,पडेल- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,पाटगांव- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,पेंढरी- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,फणसे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,पोंभुर्ले- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,पोयरे- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,साळशी- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,सांडवे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,सौंदाळे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,तोरसोळे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,उंडिल- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,वाघिवरे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण ,वाघोटन, सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला ,विजयदुर्ग- सरपंच पदासाठी आरक्षण अनुसूचित जमाती महिला असे ३८ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाचे आरक्षण आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)