पुस्तकांचे गाव मालपे गावची ४० वर्षानंतर डांबरीकरणाची प्रतिक्षा संपली.
श्रावण | गणेश चव्हाण : देवगड तालुक्यातील पुस्तकांचे गांव म्हणुन मानांकन मिळालेले व शासनाच्या पर्यटन नकाशावर असलेल्या मालपे गावात, ४० वर्षापुर्वी डांबरीकरण केलेला मार्ग, खासदार फंडातून, परत डांबरी करण होत आहे. या मार्गाचे भुमीपुजन नुकतेच माणुस्की फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मालपेकर यांचे हस्ते सरपंच सादिक डोंगरकर, यांच्या उपस्थितीत ६ नोव्हेंबर २२ रोजी करण्यात आले.
तरेळे – विजयदुर्ग रा. मार्ग. क्र. १७७ (मालपा तिठा) ते मालपे पर्यंत जाणारा हा दुर्लक्षीत रस्ता बांधकाम विभागाने ४० वर्षांनंतर का होईना हाती घेतला आहे. हा कित्येक वर्षे डांबरीकरणा पासून वंचित राहिला होता. या काळात मालपे मार्गावर लहान मोठे असे अनेक अपघात झाले. वाहन चालकांना वाहन चालवतांना कसरत करावी लागत होती. सदर रस्त्यासाठी, ग्रामपंचायत पोंभुर्ले -मालपेवाडी व माणुसकी फाउंडेशन
यांच्या पाठपुराव्यामुळे व खा. विनायकजी राऊत ह्यांच्या शिफारशीने रक्कम रु. २८१९०००/- एवढा निधी मंजूर झाला आहे. सदर रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच माणुस्की फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व उद्योजक प्रसाद मालपेकर यांचे हस्ते संपन्न झाला.
यावेळी पोंभुर्ले मालपे सरपंच सादिक डोंगरकर, उपसरपंच प्रदिप (काका) फाळके, प्रसाद मालपेकर, ठेकेदार नयन यादव, फाऊंडेशनचे सचिव सुहास मालुसरे, श्री आपटे, महेश वेदरकर, जयवंत केसरकर, श्री जोशी, श्री घाडी, गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)