आय. पी. एस. सुब्रमण्यम केळकर यांच्या नीतिशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : यू.पी.एस.सी, एम.पी.एस.सी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने चिंदर गावचा सुपूत्र आणि यू.पी.एस.सी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेले आय. पी. एस – सुब्रमण्यम केळकर यांनी आपले प्रशिक्षण कालावधीतच लिहिलेल्या नीतिशास्त्र या पुस्तकाचे प्रकाशन सेवानिवृत्त सनदीअधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.यासाठी लेखक सुब्रमण्यम केळकर हे प्रशिक्षणात असल्याने ऑनलाईन सहभागी झाले होते.याबाबत बोलताना लेखक केळकर यांनी सांगितले की एम.पी.एस.सी अभ्यासक्रमात बदल झाल्याने नीतिशास्त्र पुस्तकाची गरज निर्माण झाली होती. नीतिशास्त्रावर मराठीत कमी साहित्य उपलब्ध आहे.त्यात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार परीपूर्ण आणि नेमके पुस्तक उपलब्ध नसल्याने हे पुस्तक लिहिण्याचे अनेकांनी सुचविले. म्हणून प्रशिक्षणाची धावपळ असतानाही रोज दिवसभराचे प्रशिक्षण झाल्यावर वेळ मिळेल तसा रात्रीचे एक दोन तास काम करुन हे पुस्तक पुर्ण केल्याचे केळकर सांगतात.तसेच हे पुस्तक महाराष्ट्रभर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सुब्रमण्यम केळकर सांगतात.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)