मुणगे गावामध्ये आढळला "हाऊचरा माळढोक" पक्षी..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
मुणगे गावांमध्ये सापडलेल्या अबुधाबी येथून आलेल्या पक्षाचे गुढ उलगडले आहे. हा पक्षी हाऊचरा माळढोक या जातीचा असून प्रजनन कालावधीतील प्रवास समजण्यासाठी त्याच्या पायात रिंग अडकवून त्याला सोडण्यात आले.याबाबतची माहिती मानद वन्य जीव संरक्षक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांनी दिली आहे.हा पक्षी अबुधाबीतून राजस्थान मार्गे पाकिस्तानला जायचे असून वाटेत तो मुणगे येथे थांबला असताना सापडला याबाबत राजस्थान राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून या पक्षाला पुढील प्रवासासाठी सोडायचे का याबाबत निर्णय घेतल्या जाणार आहेत.
मुणगे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजीवनी बांबुळकर यांच्या घराजवळ च्या बागेत गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एक विदेशी पक्षी आढळून आला असून या पक्षावर असलेल्या बिल्यावरून तो अबुधाबी येथून सोडण्यात आले असल्याचे वनविभागाकडून निदर्शनास आले आहे. हा पक्षी निदर्शनास येताच संजीवनी बांबूळकर यानी वनविभागाशी सर्पक साधून वनपाल सादिक फकीर, वनरक्षक निलेश साठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तो राखाडी रंगाचा विदेशी पक्षी ताब्यात घेतला तो कोणत्या जातीचा आहे याबाबत स्पष्ट झाले नाही परंतु हा पक्षी त्याच्या वर असलेल्या वरून तो अबुधाबी येथून सोडलेला असल्याचे वन विभागाचे निदर्शनास आले आहे. मानद जीव रक्षक प्राध्या. नागेश दप्तरदार यांनी यासंदर्भात बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली असून येत्या दोन दिवसात याबाबत अधिक माहिती उपलब्ध होणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)