ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वैभवी पेडणेकरचा भिरवंडेकर सावंत मंडळींच्या वतीने सत्कार!

वैभवी पेडणेकरचा भिरवंडेकर सावंत मंडळींच्या वतीने सत्कार!

प्रकाशन: 15 Sep 2021 06:40 AM
वाचन संख्या 43

प्रतिनिधी / मसुरे : मसुरे गावची कन्या वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिने कला- क्रीडा- साहित्य- सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. सर्व स्तरावरती मसुरे गावाचे नाव उज्वल केले. विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक प्राप्त केलेले आहेत. तिच्या या घवघवीत यशाबद्दल मसूरे मार्गाचीतड येथील भिरवंडेकर सावंत मंडळींच्या वतीने वैभवी हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मुंबई येथील युवा समाजसेवक स्वप्नील देवेंद्र सावंत म्हणाले, वैभवी पेडणेकर हिने मसूरे गावाचे नाव सर्व स्तरावर ती राज्यभर पोचविले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या गुणी कन्येचा आदर्श आज सर्वांनी घेणे गरजेचे आहे. वैभवी सारखी अनेक गावातील रत्ने आज खऱ्या अर्थाने या जिल्ह्याची भूषण ठरत आहेत. यापुढेही गावातील अनेक गुणवंतांच्या मागे आम्ही भिरवंडेकर सावंत मंडळी सदैव आहोत. यावेळी लक्ष्मण सावंत, मुकुंद सावंत, दिलीप बागवे, सतीश बागवे, स्वप्नील सावंत, यतीन बागवे, मिलिंद बागवे, श्रीमती श्रद्धा देवेंद्र सावंत श्रीमती माधुरी भीमराव सावंत, सौ मीनल लक्ष्मण सावंत आणि भिरवंडेकर सावंत मंडळी व मार्गाचीतड ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स