हडी पाणखोल जुवा येथे बाप्पाना निरोप !
प्रतिनिधी / मसुरे : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मालवणात तालुक्यातील हडी पाणखोल जुवा या बेटावरील पाच दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.गेले पाच दिवस गणरायाची मनोभावे पूजा अर्चा व सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)