ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने कोकणात सांस्कृतिक चळवळ निर्माण करणार -अक्षया चितळे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने कोकणात सांस्कृतिक चळवळ निर्माण करणार -अक्षया चितळे.

प्रकाशन: 08 Nov 2022 12:46 PM
वाचन संख्या 42

चिंदर | विवेक परब :
कोकण भुमी ही कलाकारांची खाण आहे. कोकणातील कलाकारांनी देशात नव्हे तर जगात अटकेपार झेंडा रोवला आहे. कोकणचा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी भाजपा साऺस्कृतीक आघाडीच्या वतीने सांस्कृतीक चळवळ उभी करणार असल्याचे कोकण विभागाच्या सांस्कृतिक आघाडीच्या संयोजीका अक्षया चितळेनी सांगितले.
दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या अक्षया चितळे यांनी वेंगुर्ले तालुका कार्यालयात भेट दिली, त्यावेळी भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत रत्नागिरी सांस्कृतिक आघाडीच्या मुग्धा भट – सामंत ह्या उपस्थित होत्या. यावेळी सांस्कृतिक आघाडी सिंधुदुर्गचे संयोजक बाळ पुराणीक, जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके यांनी सिंधुदुर्गातील सांस्कृतिक वाटचालीची माहिती दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला असलेली दशावतार व ही कला जिवंत ठेवलेली दशावतार मंडळे यांना राज्य सरकार कडून भरीव मदत मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे एक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी भाजपा साऺस्कृतीक आघाडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुणगट्टीवार यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अक्षया चितळे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत, वसंत ताऺडेल. महीला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेवक नागेश गावडे, नगरसेवीका साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व दिपक नाईक, सांस्कृतिक आघाडी ता.अध्यक्ष शैलेश जामदार, शक्ती केंद्र प्रमुख नितीन चव्हाण, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, रंगकर्मी रमेश नार्वेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व दशरथ गडेकर व पींटु सावंत, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व रसीका मठकर, वारकरी संप्रदायाचे दिवाकर कुर्ले, आनंद उर्फ बीट्टु गावडे, बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर, नितीश कुडतरकर, प्रथमेश सावंत, विश्वनाथ परब, गोविंद परब इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स