ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा गावच्या कार्तिकोत्सवाची सांगता…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा गावच्या कार्तिकोत्सवाची सांगता…!

प्रकाशन: 08 Nov 2022 03:42 PM
वाचन संख्या 48

चिंदर | विवेक परब :
संस्थान आचरे गावच्या गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवातील पालखी सोहळ्याची सांगता सोमवारी रात्रौ दिपोत्सवाने तर पहाटे सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता मंगळवारी पहाटे दहिहंडी फोडून करण्यात आली.
संस्थान आचरे गावचा सर्वात मोठा म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर हा उत्सव रंगतो. यात रात्रौ पालखी सोहळा असतो तर पहाटे विठ्ठल मंदिरात काकड आरती रंगते. कार्तिक दशमीला आचरा वरचीवाडी येथील नारायण मंदिराला तर कार्तिक एकादशीला देवूळवाडी येथील विठ्ठल मंदिराला श्री विष्णू विराजीत पालखी भेट देते. त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी रामेश्वर मंदिर आणि दिपमाळा आकर्षक फुलांनी सजविण्यात येवून दिपोत्सव करण्यात आला होता. काही ठराविक वेळीच होणारे पंचमुखी महादेवाचे दर्शन त्रिपुरारी पूर्णिमेदिवशी होत असल्याने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे विठ्ठल मंदिरातील काकड आरतीला प्रदक्षिणेनंतर पावल्यांचा फेर धरून दहिहंडी फोडून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स