हडपीड मठ येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात संपन्न…!
मसुरे | प्रतिनिधी :
देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विधिवत पूजा, अभिषेक, महाआरती आदी कार्यक्रम झाल्या नंतर सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त गाभाऱ्या सह मंदिर परिसरात हजारो दिव्यांची आरास करण्यात आली होती. पारंपरिक दिव्यांच्या उजेडाने परिसर झळाळून गेला होता. यावेळी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या सह पदाधिकारी व स्वामी भक्त उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)