ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कशेडी बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण..!

कशेडी बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण..!

प्रकाशन: 07 Nov 2022 10:19 AM
वाचन संख्या 80

ब्यूरो न्यूज : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यांचे काम पूर्णत्वास जात आहे. बोगद्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून, केवळ काँक्रीट रस्त्याचे काम बाकी आहे. एकूण ९ किलोमीटरच्या लांबीत २ किलोमीटरचे समांतर दोन बोगदे आहेत. सध्या या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्णत्वास गेले. असून मार्च अखेरपर्यंत एक बोगदा वाहतुकीस सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात ‘ब्लॅक स्पॉट’ ठरलेल्या वळणावर अपघात होतात. पावसाळ्यात दरडी कोसळून महामार्ग बंद राहतो. घाटाच्या चढ आणि उतारात कार चालकांचा तासाभराचा कालावधी जातो. यावर उपाय म्हणून कशेडीत बोगदा करण्याचे ठरले. त्यानुसार ऑक्टोबर २०१९ मध्ये बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना परिस्थितीमुळे मनुष्यबळ न मिळाल्याने कामाला गती मिळाली नाही. दरम्यान कशेडी बोगद्याचे आतील बहुतांशी काम झाले असून केवळ रस्त्याचे काम बाकी आहे. त्यामुळे मार्च अखेरीस करोडीतील एक बोगदा खुला करण्यावर भर
देण्यात आला आहे. पुढील चार महिन्यात उर्वरित काम पूर्ण करून वाहतुकीस खुला केला जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स