तारकर्ली च्या वारकरी वै.श्रीमती शालिनी जनार्दन केळुसकर यांचे निधन…!
तारकर्ली | सुरेश बापार्डकर : मालवण तालुक्यातील तारकर्ली गावच्या वारकरी भगिनी वै. श्रीमती शालीनी जनार्दन केळुसकर यांचे वयाच्या ८५ वर्षी गोरेगाव येथे अल्पशा आजारांनी कार्तिकी एकादशी शुक्रवार दिनांक ४/११/२०२२ रोजी निधन झाले.
वै. जनार्दन विठोबा केळुसकर (जना बूवा ) यांच्या त्या पत्नी होत.
अतिशय कष्टमय काम करून देवली गावी वीस ते पंचविस वर्षे मासे विकून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांचे सारे कुटुंबच प्रत्येक वर्षी वारीला न चुकता जात असत.(श्री ज्ञानेश्वर, निवृत्ती, सखुबाई, मुक्ताबाई ) ही त्यांच्या मुलांची नावे त्यांनी ठेऊन संत परंपरा घरात जपली. त्यांना कळवा येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.भांडुप पश्चिम येथील यशवंत चांदजी सावंत कॉलेज वरील जेष्ठ शिक्षक श्री .निवृत्ती जनार्दन केळुसकर यांच्या त्या आई होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)