ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी सुरेश चौकेकर यांची निवड…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी सुरेश चौकेकर यांची निवड…!

प्रकाशन: 06 Nov 2022 10:31 AM
वाचन संख्या 59

भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.

चिंदर | विवेक परब : आगामी कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक लक्षात घेऊन भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी माध्यमिक शिक्षक म्हणून ३५ वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त झालेले व विविध संस्थांवर काम केलेले शिक्षक चळवळीतील कार्यकर्ते सुरेश ज्ञानदेव चौकेकर यांची निवड करण्यात आली . त्यांनी सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर व वराड कनिष्ठ महाविद्यालय येथे माध्यमिक शिक्षक म्हणून ३५ वर्ष सेवा केली . तसेच माध्यमिक शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेली ३२ वर्ष संघटनेत कार्यरत व नेतृत्वही केले. त्यांनी मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून यशस्वी कारकीर्द केली . ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे स्वीकृत सदस्य ही होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक. ली.चे संचालक म्हणून काम केले. मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ ली. मालवण चे व्हाईस चेअरमन होते. तसेच वैभवलक्ष्मी बिगरशेती सहकारी पतसंस्था ली. चौकेचे चेअरमन म्हणून काम पाहिले. मालवण तालुका माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्था लि. कट्टा चे चेअरमन व सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्ग चे संचालक तसेच कुलस्वामिनी सह. गृहनिर्माण संस्था मर्या. सिंधुदुर्गनगरीचे चेअरमन म्हणून जबाबदारी स्वीकारली .
अश्या प्रकारे जिल्ह्यातील विविध संस्थांवर काम केलेले व शिक्षक चळवळीतील अनुभवी व्यक्तीमत्व सुरेश चौकेकर यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुडाळ मधील महालक्ष्मी हाॅल मध्ये संपन्न झालेल्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये चौकेकर सरांची निवड जाहीर होताच सर्वांनी टाळांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले .
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आम.अजीत गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महीला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरेसे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई व अशोक सावंत, प्रवक्ते संजु परब, जेष्ठ नेते राजू राऊळ व्यासपीठावर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स