ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगने घडविली जुन्या हॉलीवुडची सफर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगने घडविली जुन्या हॉलीवुडची सफर..!

प्रकाशन: 05 Nov 2022 02:36 PM
वाचन संख्या 37

मसुरे | प्रतिनिधी :
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवली येथे विद्यार्थ्यांनी फॅशन बद्दल प्रेझेंटेशन सादर केली. फॅशन हिस्टरी या विषयांतर्गत 1940 पासून च्या हॉलीवुड फॅशनचा अभ्यास करून मुलांनी हे सादरीकरण केले .
सरचिटणीस युवा भाजपा सिंधुदुर्ग संदीप मेस्त्री यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना फॅशन व इंटिरियर मधील मुलांचे व प्राध्यापक वर्ग व मॅनेजमेंटचे कौतुक केले. व या कॉलेजला आमदार नितेश राणे लवकरच भेट देतील असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फॅशन डिझायनिंग मधील हे एकमेव कॉलेज असुन विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे . तसेच तसेच शॉर्ट टर्म कोर्स साठी सिंधुदुर्ग जिल्हातील सर्व युवक युवतीनी, गृहिणीनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणांमध्ये कुमारी मिताली शिंदे हिने 1940 ते 1949 या वर्षांमधील हॉलिवूड फॅशनचे माहिती दिली तसेच त्या काळातील फॅशन वरून प्रेरणा घेऊन तिने आपला पेहराव केला होता. त्यानंतर ललना पाटणकर हिने मधुबालाच्या पेहराव मध्ये 1950 ते 59 या दशकातील फॅशनची माहिती दिली.अनारकली च्या रूपात कुमारी सुवर्णा करमळकर हिने साठच्या दशकातील फॅशन बद्दल सांगितले त्यानंतर पोलका डॉटेड शर्ट ब्लाउज मध्ये कुमारी किरण मेस्त्री हिने सत्तरच्या दशकातील सफर घडून आणली. तर खूबसूरत मधील रेखाच्या लुक मध्ये कुमारी केतकी काकतकर हिने 80 च्या दशकाबद्दल माहिती दिली. तसेच कुछ कुछ होता है मधील काजोल झालेली कुमारी तृप्ती भोगले 90 च्या दशकात घेऊन गेली. त्यानंतर संजना सावंत हिने जब उई मेट मधील गीत करून आपल्या http://localhost/news/public/uploads/2000 च्या दशकातील माहिती दिली.. राणी काशीबाईच्या सुरेख पेहरामध्ये कुमारी चिन्मयी सावंत हिने आपल्याला http://localhost/news/public/uploads/2010 च्या दशकाची माहिती दिली.
हे प्रॅक्टिकल करण्यासाठी फॅशन विभागातील प्राध्यापिका कुमारी सायली तळवडेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सार्था कदम, मनीषा देसाई, स्नेहा कामत, अक्षयी एडवे, अमेय पारकर यांनी सहकार्य केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स