ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
भुईबावडा घाट रस्ता रुंदीकरणासाठी प्रयत्नशील - आमदार नितेश राणे.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भुईबावडा घाट रस्ता रुंदीकरणासाठी प्रयत्नशील - आमदार नितेश राणे.

प्रकाशन: 02 Nov 2022 11:01 PM
वाचन संख्या 52

घाट मार्गाची अधिकाऱ्यांसमवेत आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी.

वैभववाडी | नवलराज काळे : भुईबावडा घाट दुरुस्तीसाठी सव्वा दोन कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हा घाट मार्ग रुंदीकरण करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.आमदार नितेश राणे यांनी भुईबावडा घाटाची पाहणी केली. दरडीचा मोठा भाग कोसळल्या ठिकाणी आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. तसेच घाटात शंभर मीटर अंतरावर भेग गेली आहे. त्या ठिकाणी पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या घाटाच्या संरक्षण कडे तसेच भिंतीकडे दुर्लक्ष करू नका. करूळ घाटाप्रमाणे हा देखील महत्त्वाचा घाट आहे. या घाटाचा उपयोग पर्यायी चांगला होत आहे. त्यामुळे या घाटाकडे विशेष लक्ष देणार घाट रुंदीकरणासाठी निधी उभा करणार असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स