बिळवस श्री देवी सातेरी जलमंदिर येथे ४ नोव्हेंबरला हरिनाम सप्ताह..!
६ नोव्हेंबरला कार्तिकी जत्रोत्सव.
मसुरे | प्रतिनिधी : कसबा मसुरे गावची मुळमाया बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदीरामध्ये ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वा. पासुन सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सदर दिवशी भाविक-भक्तांनी आपल्या भजनी मेळ्यासह उपस्थित राहुन हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.
तसेच ६ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिकी जत्रोत्सव होणार आहे. देवीची विधीवत पुजा-अर्चा, रात्री पुराणवाचन, पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे व त्यानंतर ठिक १२.०० वा चेंदवणकर गोरे पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचा महान पौराणीक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त तसेच नाट्य रसिक यांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)