ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डीएड बॅचमेट ३७ वर्षानंतर आले एकत्र..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डीएड बॅचमेट ३७ वर्षानंतर आले एकत्र..!

प्रकाशन: 01 Nov 2022 12:50 PM
वाचन संख्या 58

कै.सौ.इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय ,कणकवलीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा समारंभ संपन्न..!

मसुरे | प्रतिनिधी :
कै.सौ.इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय कणकवली या अध्यापक विद्यालयातून सन १९८५ मध्ये अध्यापक पदविका मिळवलेली डीएड बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पिसेकामते येथील मैत्री गार्डन रिसाॅर्ट येथे झाला. मानसशास्त्र हा विषय शिकविणाऱ्या अध्यापिका अरूणा परशुराम आपटे यांच्या हस्ते स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सर्व डीएड बॅच वर्गमित्र मैत्रीणिंचे स्वागत करून सौ.सुजाता कदम,सौ.शुभांगी तरावडे,सौ.पुष्पा बालम ,सौ नंदा पेडणेकर यांच्या सुस्वर शालेय प्रार्थनेने स्नेहमेळाव्याची सुरूवात करण्यात आली.

सर्वांचा परिचय करण्यात आला.श्री.सुरेश कदमांनी उत्कृष्ट निवेदन केले .कवी उदय सर्पे यांनी प्रास्ताविक करून मैत्रीगीत सादर केले.आदरणीय अरूणा आपटे यांचा बॅचच्या वतीने शाल श्रीफळ व साडी देऊन ह्रद्य सत्कार करण्यात आला.मॅडमानी आपले विचार मांडले शिक्षकांनी प्रत्येक खेडेगावात प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य केले यातच आमचे सुख आहे असे सांगितले. श्री.नारायण आयरे,श्री.जयसिंग कांबळे,शुभांगी तरावडे,निर्मला सावंत,नंदा कदम आणि सुलभा पिळणकर यांनी आपली मनोगते मांडली. आभारप्रदर्शन श्री.सुभाष लोकरे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स