अग्निशमन दल प्रमुख अधिकारीपदी संजय मांजरेकर यांची नियुक्ती..!
मसुरे | प्रतिनिधी :
मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुख अग्निशमन अधिकारीपदी राष्ट्रपती पदक प्राप्त देवगड तालुक्यातील मिठबाव येथील संजय यशवंत मांजरेकर यांची नियुक्ती झाली आहे. मावळते अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी पदाचा कार्यभार ३१ ऑक्टोबर रोजी मांजरेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
मुंबई अग्निशमन दलातील उपप्रमुख अग्निशमन अधिकारी संजय यशवंत मांजरेकर याना अग्निशमन दलातील उत्कृष्ट सेवे बद्दल ‘राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवापदक’ जानेवारी महिन्यात जाहीर झाले होते. देशाचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सदर पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. मिठबाव उत्कटवाडी येथील संजय मांजरेकर यांनी १९८९ मध्ये मुंबई अग्निशमन दलात सहा. केंद्र अधिकारी म्हणून भायखळा येथून आपल्या सेवेचा प्रारंभ केला. त्यानंतर विक्रोळी, भेंडीबाजार येथील केंद्रावर सेवा बजावत नाना चौक येथील अग्निशमन केंद्रावर डेप्युटी चीफ फायर ऑफिसर या पदावर कार्यरत होते. सेवेची ३३ वर्ष पूर्ण करणाऱ्या मांजरेकर यांनी सेवाकालावधीमध्ये अनेक वेळा प्रशंसनीय काम केले आहे. ९१ सालची मुंबई दंगल, साखळी बाँब स्फोट, भेंडी बाजार इमारत दुर्घटना अशा मोठ्या प्रसंगात केलेल्या चांगल्या कार्याबद्दल त्यांना कमिशनर यानी रजत पदक देऊन सन्मानित केले होते. संजय मांजरेकर यांच्या नियुक्ती बद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)