ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
एसटीचे कळणार आता ‘लाइव्ह लोकेशन’.

एसटीचे कळणार आता ‘लाइव्ह लोकेशन’.

प्रकाशन: 30 Oct 2022 04:21 PM
वाचन संख्या 103

राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी बसवणार ‘व्हीटीएस’ यंत्रणा…!

मुंबई | ब्यूरो न्यूज :
अनेकदा प्रवाशांना एसटी स्टॅण्डवर येऊन बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. गावी जाणारी एसटी कुठवर आली, कधी येणार वगैरेची उत्तरे खिडकीवर समाधानकारकरीत्या मिळत नाहीत. मात्र, लवकरच हा अनुभव सर्व इतिहासजमा होणार आहे. कारण, तुम्हाला हव्या त्या एसटी बसचा ठावठिकाणा लगेचच कळू शकणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने सर्व गाड्यांमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) ही प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. काही ठिकाणी स्क्रिनच्या अडचणी असून, येत्या आठ दिवसांत ‘लाइव्ह लोकेशन’ प्रणालीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘व्हीटीएस’ यंत्रणा कार्यान्वित करत आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर प्रवाशांना संबंधित एसटी कोणत्या भागातून धावत आहे, तिचे शेवटचे लोकेशन काय होते, संबंधित बसस्थानकावर येण्यास किती वेळ लागणार आहे, तसेच सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ काय, हे सर्व समजू शकणार आहे. त्यासाठी आगारांमध्ये डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले असून, ते लवकरच कार्यान्वित होणार आहेत. अपघात झाल्यास तत्काळ अपघातस्थळी मदत पोहोचविता यावी यासाठीही या यंत्रणेचा लाभ होणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स