मागवणे पुलाच्या संरक्षक कठड्याचे पाइप गायब..!
सा. बां. विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी.
श्रावण | गणेश चव्हाण :
सिंधुदुर्गातील महसुलने मोठे असलेले मालवण मधील मसुरे गावच्या मागवणे येथील जिर्ण झालेले पुलाचे साईड पोल लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी जेष्ठ नागरीक रमेश चव्हाण यांनी केली आहे.या पुलाचे बांधकाम झाल्यावर अनेक वर्षे झाली. परंतु या पुलाकडे प्रशासनाने किंवा बांधकाम विभागाने अजिबात लक्ष दिलेला नाही. कित्त्येक वर्षांपूर्वी त्या पुलाच्या कडेला लोखंडी पोल उभारून, हा संरक्षण कठडा तयार केलेला होता. त्याचे लोखंडी पोल पूर्णपणे गंजून पाईप गायब झाले आहेत. गुरेढोरे व शाळेचे विद्यार्थी या पुलावरून ये जा करत असतात. लोखंडी पोल लवकरात लवकर नव्याने बसवण्यात यावेत. पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले असल्याने शासनाने वेळीच दखल घेऊन, या पुलाची लवकरात लवकर दुरुस्त करावी. अशी मागणी सर्व जनतेच्या वतीने चव्हाण यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)