ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्ह्यात १११ पोलीस पदे भरणार..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्ह्यात १११ पोलीस पदे भरणार..!

प्रकाशन: 28 Oct 2022 02:27 PM
वाचन संख्या 83

३ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारणार..!

मुंबई | ब्यूरो न्यूज :
महाराष्ट्र शासनाने राज्यात २० हजार पोलीस पदांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हयात ९० पोलीस शिपाई व २१ पोलीस वाहन चालक अशी १११ पोलीस पदांची भरती होणार आहे लवकरच पोलीस पदाची जाहिरात प्रसिद्ध करून ३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. गेली दोन वर्षे पोलीस भरती झाली नव्हती. त्यामुळे युवावर्गाला पोलीस भरतीची प्रतीक्षा होती. पोलीस भरतीला नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात २० हजार पोलीस पदे भरणार असे जाहीर केले होते. त्यानंतर संभाव्य रिक्त पदांची यादी जाहीर केली आहे.

पोलीस भरतीमध्ये रिक्त पदे असलेल्या संभाव्य यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात १११ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये ९० पोलीस शिपाई पदे आणि २१ पोलीस वाहन चालक पदे भरली जाणार आहेत पोलीस पदास प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक त्यामधून एकूण पदाच्या एकास या प्रमाणात उमेदवारांची १०० लेखी परीक्षा घेतली जाणार त्यात किमान ४० टक्के गुण आवश्यक आहे. त्यामधून गुणवत्ता तयार करून भरती केली जाणार

सिंधुदुर्ग पोलीस दलातील रिक्त भरण्यासाठी लवकरच जाहिरात केली जाणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस यंत्रणे कडून देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स