कास वाघबिळकार मंदिरामध्ये खास दिपावलीनिमीत्त रंगला डबलबारीचा जंगी सामना .
बांदा | राकेश परब :
कास वाघबिळकार मंदिरामध्ये वाघबिळकार मित्र मंडळाने कास गावामध्ये प्रथमच आयोजित केलेला बुवा श्री आपा उर्फ दिनेश भी. गावडे निगुडे ता.सावंतवाडी विरूद्ध बुवा श्री.प्रविण मार्गी हुमरमळा वालावल ता.कुडाळ यांचा डबलबारी जंगी सामना संपन्न झाला.कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर माजी सैनिक शंकर भाईप,संजय भाईप, बुवा आपा उर्फ दिनेश गावडे, बुवा प्रविण मार्गी, जेष्ठ नागरीक संदानंद भाईप, प्रकाश भाईप, एकनाथ सातार्डेकर, उत्तम सातार्डेकर मान्यवर उपस्थित होते.माजी सैनिक शंकर भाईप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून जेष्ठ नागरीक संदानंद भाईप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.डबलबारीचा जंगी सामना पहाण्यासाठी बांदा तसेच मडुरा दशक्रोशीतुन शेकडो श्रोते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)