ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीचा धान्यपुरवठा ठप्प..!

नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीचा धान्यपुरवठा ठप्प..!

प्रकाशन: 22 Oct 2022 10:48 PM
वाचन संख्या 31

ऑफलाईनसाठी स्थानिकांचा पुढाकार .

बांदा |राकेश परब : नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीमधील धान्यपुरवठा शनिवारी ठप्प झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावरच नेटवर्क समस्या दुपारपर्यँत कायम राहिल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पंडीत यांनी सावंतवाडी तहसीलदारांशी संपर्क साधला. मात्र तहसीलदारांनी ऑफलाईन पुरवठा करण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे अखेर स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत ऑफलाईन धान्यपुरवठा करण्यास सुरुवात केली.
ग्रामीण भागात सध्या नेटवर्क समस्या ही रोजचीच झाली आहे. त्याचा फटका शनिवारी कास सोसायटीच्या धान्य दुकानाला बसला. शनिवारी सकाळपासूनच नेटवर्क समस्या असल्याने ग्राहकांचा खोळंबा झाला. चार तास ताटकळत राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. नेटवर्क समस्या कायमची असल्याची तक्रार स्थानिकांनी केली.

सामाजिक कार्यकर्ते प्रविण पंडीत यांनी नेटवर्क समस्येची माहिती तहसीलदारांना दिली. मात्र ऑफलाईन धान्यपुरवठा करण्यास त्यांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे स्थानिकांनीच पुढाकार घेत ऑफलाईन धान्य देण्यास सुरुवात केली.
 यावेळी देविदास सातार्डेकर, प्रविण पंडीत, सुवर्णा पंडीत, ज्ञानेश्वर किनळेकर, सुलोचना पंडीत, मारुती किनळेकर, किर्ती पंडीत, कृष्णा पंडीत, सुप्रिया पंडीत, प्रेरणा राणे, सीताबाई पंडीत, सिताबाई भगत, आनंदी कासकर, सुविता कासकर, विष्णू कासकर, लक्ष्मी कासकर, शुभांगी राणे, पार्वती पंडीत, श्रीराम सातार्डेकर, लवू हरमलकर, मनोहर किनळेकर, गणेश न्हावी, भागिरथी हरमलकर आदींनी पुढाकार घेतला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स