सावंतवाडीतील विद्यार्थ्याचे पर्यावरण रक्षणाचे आगळेवेगळे उदाहरण…!
मुख्याधिका-यांकडून छोट्या स्वच्छतादुताचे विशेष कौतुक…!
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज :
सावंतवाडी येथील शांती निकेतन इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता पहिलीत शिकणारा निसर्ग व प्राणिमित्र म्हणून प्रसिद्ध असलेला कु. कबीर जफर नवीद जफर हेरेकर या चिमुकल्याने समाजासमोर निसर्ग व पर्यावरण रक्षणाचे एक अनोखे उदाहरण सादर केले आहे. या मुलाने आपल्या घरामध्ये, मित्रांकडे व शेजाऱ्यांकडे वापरामध्ये येणारे चाॅकलेट, चिप्स,तेलाची पिशवी, दुधाच्या पिशव्या व इतर प्रकारचे प्लास्टिक गेली सहा महिने गोळा करुन ते सर्व रिकामी पाण्याच्या बाॅटल मध्ये भरले आहे. आपण जेव्हा हे प्लास्टिक बाहेर फेकतो तेव्हा हे प्लास्टिक गाई, म्हशी, माकड व इतर प्राणि ते खातात व ते प्लास्टिक त्यांना न पचता त्यांच्या मृत्युचे कारण ठरते. मातीत मिळाल्याने पर्यावरण देखील दुषीत होते म्हणून कबीर ने आपण भरलेली सगळ्या बॉटल्स सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री जयंत जावड़ेकर यांच्या स्वाधीन केल्या. कबीरच्या या कार्याचे मुख्याधिकारी श्री जावड़ेकर यांनी अगदी मनापासून कौतुक केले आणि भविष्यात देखील असे कार्य करत राह व आपल्या मित्रांना देखील प्रोत्साहित करत राह असे सांगितले. तुझे हे कार्य स्वच्छ भारत अभियान चा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे असे श्री. जावड़ेकर कबीरला म्हणाले. मुख्याधिकारी श्री जावड़ेकर व कु. कबीर असे दोन पर्यावरण व निसर्ग प्रेमी यांच्या मध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)