पळसंब गावच्या श्री जयंतीदेवी रवळनाथ देवस्थान ट्रस्टला शासनमान्यता..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पळसंब वासियांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री जयंतीदेवी रवळनाथ देवस्थान पळसंबला “श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट ” अशी शासनाची रजिस्टर मान्यता मिळाली आहे.
या साठी देवस्थान कमिटी व पळसंब गावाच्या वतीने अर्जदार म्हणून पळसंब सरपंच श्री चद्रकांत गोलतकर यानी काम पाहिले.
देवस्थान ट्रस्ट होण्यासाठी पळसंब गावाची असलेली धडपड आज सार्थकी लागली आहे. भविष्यात देवस्थानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातील.आणि रूढी परपंरा गुण्यागोविंदाने जपल्या जातील असे मनोगत पळसंब सरपंच / देवस्थान ट्रस्टचे सचिव चंद्रकांत विजय गोलतकर यानी व्यक्त केले आहे. सर्वाच्या सहकार्याबद्दल तसेच आयुक्त अधिकारी श्री अरुण भुईबंर,ऑडिटर – श्री. अभय सुकाळी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे देवस्थानच्या वतीने सरपंच यानी आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)