ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
नारिंग्रेत ८० लाख रुपये खर्चाच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन..!

नारिंग्रेत ८० लाख रुपये खर्चाच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन..!

प्रकाशन: 20 Oct 2022 07:21 PM
वाचन संख्या 64

सरपंच श्रीकांत गावकर यांची वचनपूर्ती…!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील नारींग्रे येथील सरपंच श्रीकांत गावकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला गावाला मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करून देईन व गावातील रस्ते दर्जेदार करेन असे वचन दिले होते. गावासाठी दर्जेदार पाणीपुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेला शब्द नारींग्रे सरपंच श्रीकांत गावकर यांनी पूर्ण केला असून ८० लाख निधीतून नवीन नळपाणी योजना मंजूर झाली आहे. या कामाचे भूमिपूजन नुकतेच शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, याशिवाय ग्रामपंचायत इमारत बांधणी साठी २८ लाख निधी उपलब्ध झाला आहे,
नारींग्रे नायकाचा व्हाळ बंधारा बांधण्यासाठी १२ लाख निधी मंजूर झाला आहे,नारींग्रे जोगलवाडी दत्तमंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण कामासाठी ५ लाख निधी मंजूर झाला आहे,नारींग्रे साकवा जवळ संरक्षण भिंत बांधण्यासाठी ६० हजार निधी मंजूर झाला आहे,नारींग्रे गिरावळ व्हाळ खार बंधारा ७ लाख निधी मंजूर झाला आहे,सदर विकास कामे लवकरच पूर्ण होतील मला गावाने थेट सरपंच म्हणून निवडून आणले ग्रामस्थांचा विश्वास जपून गावासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून केवळ गावाचा विकास हेच माझे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन सरपंच श्रीकांत गावकर यांनी व्यक्त केले,नारींग्रे नळपाणी योजना भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते . शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते
नारींग्रे नळपाणी योजना भूमिपूजन
नारीग्रे जोगलवाडी दत्तमंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण,नारीग्रे साकवा जवळ संरक्षण भिंत बांधणे आदी विकास कामाचे भूमिपूजन पार पडले,यावेळी शिवसेना देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम,नारिंग्रे सरपंच श्रीकांत गावकर
ग्रा.पं सदस्य संतोष सावंत, तनिषा राणे , विद्या (सुमा) बावकर
शाखाप्रमुख दीपक पवार
युवासेना उप तालुकाप्रमुख मनोज भावे, विलास शिंदे, लऊ दळवीं
अरुण कदम राकेश कदम
बबन घाडी प्रदीप घाडी विजय कदम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स