ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शालेयखेळ क्रीडा संस्थेच्या मागण्यांबाबत क्रीडा आयुक्त सकारात्मक…!

शालेयखेळ क्रीडा संस्थेच्या मागण्यांबाबत क्रीडा आयुक्त सकारात्मक…!

प्रकाशन: 20 Oct 2022 11:37 AM
वाचन संख्या 47

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
शालेयखेळ क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्य संघटना आणि क्रीडा संचालनालय यांच्यात सोमवारी (१७ ऑक्टोबर) झालेली बैठक सकारात्मक झाली. ४४ क्रीडा प्रकारातील खेळाडूंना क्रीडा सवलत गुण मिळावेतया मुख्य मागणीसह अन्य मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनीसंघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक दाखवून आगामी काळात हा प्रश्न सोडवला जाईल असे याबैठकीस राज्यभरातून आलेल्या क्रीडा संघटकांना स्पष्ट केले. पुण्यातील बालेवाडीक्रीडा संकुलात क्रीडा संचालनालयात शालेय खेळ क्रीडा संस्था व क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांची एक महत्त्वाची बैठक सोमवारी झाली. या बैठकीस शालेय खेळ क्रीडा संस्थेचेअध्यक्ष शाम भोसले, सचिव शिवाजी साळुंखे, खजिनदार ॲड. राज वागदकर, उपाध्यक्ष रवींद्र चोथवे, महावीर धुळधर, सदस्य संदीप गाडे, सी. ए. तांबोळी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडेयांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत शालेयखेळ क्रीडा संस्थेचे अध्यक्ष शाम भोसले, सचिव शिवाजी साळुंखे यांनी ४४ क्रीडा प्रकारांच्याविविध मागण्या क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांच्यासमोर मांडल्या. ४४ क्रीडा प्रकारात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना क्रीडा सवलत गुण (ग्रेस गुण) मिळावेत ही प्रमुख मागणी होती.शासनाच्या सर्व अटी नियमांचे पालन करुन शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल असेयावेळी शालेय खेळ क्रीडा संस्थेतर्फे आवर्जून सांगण्यात आले. २०१३ मध्ये ४४ क्रीडाप्रकारांचा समावेश शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये करण्यात आला होता. या क्रीडा प्रकारांनाक्रीडा सवलत गुण मिळावे यासाठी यापूर्वीचे क्रीडा आयुक्तांनी शालेय शिक्षण व क्रीडाविभागाचे अवर मुख्य सचिवांना १७ जून २०२१ रोजी शिफारस केलेली आहे. शालेय खेळ क्रीडासंस्थेच्यावतीने देखील या विषयाचा सातत्याने पाठपुरावा शासन दरबारी पत्र व्यवहाराच्यामाध्यमातून केलेला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आपण देखील आपल्याकार्यालयाच्यावतीने या ४४ क्रीडा प्रकारांना क्रीडा सवलत गुण मिळावेत या संदर्भात तसेच क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा यासाठी वयोगट १४ व १७ पासूनवंचित क्रीडा प्रकारांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयालाशिफारस करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले, सचिव शिवाजी साळुंखे यांनी याबैठकीत केली. शालेय खेळ क्रीडा संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर क्रीडा आयुक्त सुहास दिवसेयांनी देखील पदाधिकाऱ्यांच्या मुख्य मागण्यांबाबत आपली सकारात्मकता दाखवत आगामी काळातहा प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, शिफारस केली जाईल असे स्पष्ट केले. शालेय खेळ क्रीडासंस्थेशी संलग्न क्रीडा संघटना शालेय खेळ क्रीडासंस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेशी एकूण ३७ क्रीडा संघटना संलग्न आहेत. त्यात चायक्वांदो(शस्त्रांग), फिल्ड आर्चरी, कुडो, म्युझिकल चेअर, आष्टेडू आखाडा, हापकिडो बॉक्सिंग,बुडो मार्शल आर्ट, वुडबॉल, लंगडी, फ्लोअर बॉल, जीत कुने दो, स्पीड बॉल, तेंग सुडो, यूनिफाईट,थांग-ता मार्शल आर्ट, कुराश, फुटबॉल टेनिस, रोप स्कीपिंग, टेनिल बॉल क्रिकेट, थाय बॉक्सिंग,मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, चॉक बॉल, टेबल सॉकर, टेनिस व्हॉलिबॉल, सिलंबम, जंपरोप, ट्रेडिशनलरेसलिंग, रस्सीखेच, मिनी गोल्फ, कोर्फ बॉल, सुपर सेवन क्रिकेट, टार्गेट बॉल, टेनिसक्रिकेट, ग्रॅपलिंग, ड्रॉपरोबॉल, पेंट्यांक्यू आणि वोवीनाम या क्रीडा प्रकारांच्या संघटनांचा समावेश आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स