उत्पादकता वाढविण्यासाठी आंबा बागांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे - संशोधक विजय दामोदर.
आचरा येथे आत्मा अंतर्गत कलमबागा पुनरुज्जीवन कार्यशाळा संपन्न..
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
आंबा बागेपासून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी आंबा कलमांचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज असल्याचे मत आंबा फळ संशोधन केंद्र रामेश्वर विजयदुर्गचे संशोधक विजय दामोदर यांनी आचरा येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी ज्या झाडांची उत्पादकता कमी झाली आहे, सुर्य प्रकाश मध्यापर्यंत पोहोचत नाही, आंबा फळाचे वजन दोनशे ग्रॅम पेक्षा कमी झाले असेल अशा झाडांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज असल्याचे सांगितले. आत्मा अंतर्गत मालवण तालुका कृषी विभागा तर्फे आचरा येथील बापर्डेकर यांच्या आंबा बागेत आंबा पुनरुज्जीवन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांच्या सोबत मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, आचरा मंडल कृषी अधिकारी दिनेश लंबे, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, आत्मा चे सहाय्यक तंत्रज्ञ निलेश गोसावी, कृषी सहाय्यक सुनील कदम, सुशिलकुमार शिंदे, अश्विन कुरकुटे, आचरा उपसरपंच पांडूरंग वायंगणकर, शेतकरी लक्ष्मण बापर्डेकर, सत्यवान बापर्डेकर, सत्यवान घाडीगांवकर, अभय भोसले, नंदकिशोर सावंत, रविंद्र बागवे, नंदकुमार तांडेल, समिर बावकर, गुरुप्रसाद कांबळी, प्रसाद चिंदरकर, राणे, स्वप्नील बापर्डेकर, यांसह अन्य शेतकरी आदी उपस्थित होते. यावेळी दामोदर यांनी आंबा बागांचे पुनरुज्जीवन करताना आंबा कलमांची कशी तोड करावी ,कटींग केलेल्या झाडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, खत व्यवस्थापन आदी बाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)