गणित संबोध परीक्षेत परुळे विद्यामंदिरचे यश...!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे च्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या परीक्षेत इयत्ता पाचवी मधील 15 पैकी 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वरदा वासुदेव सामंत हिने 100 पैकी 92 गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबरोबरच तन्मय धोंडू राणे (90 गुण) व चिन्मय महेश चव्हाण (88 गुण) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
इयत्ता आठवी मधील 32 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यापैकी 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये दर्शन सुंदर सामंत याने 100 पैकी 76 गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. शोभा केशव मुंडये हिने 74 व सानिका विठोबा दाभोलकर हिने 68 गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला
या यशस्वी विद्यार्थ्यांना तेजश्री सावंत व महेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)