ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रीय हरित लवादच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती..!

राष्ट्रीय हरित लवादच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती..!

प्रकाशन: 16 Oct 2022 10:42 AM
वाचन संख्या 62

मालवण | प्रतिनिधी : चिरेखाणींना जिल्हास्तरावरही परवानगी नाकारण्याच्या राष्ट्रीय हरित लवादच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. चिरेखाणींना यामुळे जिल्हास्तरावर परवानगी मिळू शकेल. चिरेखाण व्यावसायिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने दिलासा मिळाला.
संपूर्ण राज्यातील गौण खनिज उत्खननासाठी राष्ट्रीय हरित लवादाअंतर्गत लागू केलेले नियम व अटी जटील आहेत. कोकणातील भौगोलिक विविधता लक्षात न घेता सरसकट नियमावली लागू केल्याने त्याचा फटका बसत आहे. या नियमावलीतून कोकणातील पारंपारिक चिरेखाण व्यवसाय वगळण्यात यावा अथवा पूर्वीप्रमाणेच जिल्हास्तरावर उत्खनन परवाने देण्यात यावेत, या मागणीसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती दिली. परिणामी चिरेखाण व्यावसायिकांना जिल्हास्तरावर परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ऍड. ओवेस पेचकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स