कसालात भाजपा युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस शेकडो दिव्यांगांच्या उपस्थितीत साजरा.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस विविध उपक्रम हाती घेऊन जिल्हाभरात साजरा होत असताना आज कसाल मध्ये शेकडो दिव्यांगांच्या सोबत केक कापून साजरा करण्यात आला.
जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त भाजपा दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने कसाल येथील सिद्धिविनायक हाॅल मध्ये दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात विशाल परब यांच्या हस्ते अंधांना पांढरी काठीचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व दिव्यांगांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस उस्ताहात साजरा करण्यात आला.
यावेळी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना विशाल परब म्हणाले की भविष्यात दिव्यांगांना कोणतीही अडचण आली तर आपण मदत करू. तसेच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात दिव्यांगांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, भाजपा दिंव्याग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, जिल्हा सरचिटणीस शामसुंदर लोट, चिटनिस सुनील तांबे , दिक्षा तेली , स्वाती राऊळ, संगीता पवार, रविंद्र शिरसाठ तसेच जिल्ह्यातील २२५ दिंव्याग उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)