ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रम संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 15 Oct 2022 03:34 PM
वाचन संख्या 39

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुतक वाचनाचे महत्त्व विशद करणारा कार्यक्रम प्रथमच सा.बां. कार्यालयात संपन्न झाला.
‘पुस्तक प्रेरणा दिनाचे’ औचित्य साधून हा कार्यक्रम संपन्न झाला.

समाजाला नवी दृष्टी देण्याचे काम माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी केले.एक उत्तुंग व्यक्तिमत्व भारत देशाला प्राप्त झाले, त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि कार्याप्रती असलेल्या निष्ठेचा आदर्श घेऊन जीवनात काम करा. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड केले.
सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालय, विभाग कणकवली येथे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड बोलत होते. ते म्हणाले वाचनाने विचार समृद्ध होतात. आणि ज्या प्रदेशात समृद्ध विचार आहेत तोच प्रदेश आर्थिक दृष्ट्या पुढे गेलेला आहे.त्याच राज्यांचे दरडोई उत्पन्न वाढलेले आहे. एकीकडे इंग्रजीचा प्रभाव आणि व्यावसायिक भाषा म्हणून तिची असलेली गरज लक्षात घेताना,मराठीची संस्कृती आणि मराठी मातृभाषा टिकली पाहिजे, वाढली पाहिजे यासाठीही पुस्तक वाचन गरजेचे आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी स्वतःच्या जगण्यातूनच समाजाला प्रबोधन केलेले आहे. त्यांचे जीवन चरित्र वाचा आणि आत्मसात करा असे आवाहन यावेळी श्री सर्वगोड यांनी केले.
वाचन प्रेरणा दिनाच्या विचार मंचावर उप अभियंता कर्वे,उप अभियंता विनायक जोशी, उप अभियंता कुमुदिनी प्रभू , प्रहार चे पत्रकार संतोष राऊळ,प्रथम श्रेणी लिपिक जितेंद्र पराडकर, आरेखक आनंद कासार्डेकर, शाखा अभियंता प्रमोद कांबळे, रवींद्र किंजवडेकर, प्रणिता कोचरेकर यांनी आपले विचार मांडले.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुस्तक वाचनाचे महत्त्व विशद करतानाच सर्व कर्मचारी,अधिकाऱ्यांनी साने गुरुजींच्या “खरा तो एकची धर्म..” या कवितेचे वाचन केले.प्रणिता कोचरेकर यांनी साने गुरुजींच्या जीवनावरील एका प्रसंगाचे वाचन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स