घराजवळ वीज पडून एकाचा अंत.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या साळिस्ते येथे आज झालेल्या विजांच्या लखलखाटासह झालेल्या परतीच्या पावसात, घराच्या बाजूला वीज पडून विजेचा लोळ घरात घुसल्याने श्री. पांडुरंग नारायण गुरव (वय ५२) यांचा मृत्यू झाला.
ही घटना आज शुक्रवारी संध्याकाळी ०४ :३० च्या दरम्यान हा अनर्थ घडला आहे . या घटनेची माहिती मिळताच कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी साळीस्ते येथे धाव घेतली. या घटनेनंतर मृत्युमुखी पडलेल्या पांडुरंग गुरव यांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली असे सूत्रांकडून समजते आहे .
यावेळी तहसीलदार यांच्यासोबत मंडळ अधिकारी संतोष नागावकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)