ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नांदरूख येथे "आंबा पुनरुज्जीवन" माहिती कार्यशाळा संपन्न...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नांदरूख येथे "आंबा पुनरुज्जीवन" माहिती कार्यशाळा संपन्न...!

प्रकाशन: 14 Oct 2022 07:33 PM
वाचन संख्या 281

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

नांदरूख येथे कृषी विभाग मालवण व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नुसार “आंबा पुनरुज्जीवन” माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कोकणात डोंगरउतारावर वसलेल्या आंबा बागांमध्ये किड- रोगांचा प्रादुर्भाव दरवर्षी मोठ्याप्रमाणावर दिसून येतो. फवारणी करून देखील त्यांचे प्रमाण कमी होत नाही शिवाय बागांमधील झाडे अशक्त आहेत. त्यांच्यात फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे आणि उत्पादकता देखील कमी आहे. म्हणून अश्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे असे मत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे उद्यानविद्यावेत्ता डॉ श्री मिथीलेश सणस यांनी व्यक्त केले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्र विशेषज्ञ श्री बाळकृष्ण गावडे यांनी कीड – रोग व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण नांदरुख पलिकडची वाडी येथील श्री प्रशांत पांडुरंग चव्हाण यांच्या बागेत घेण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री दिनेश चव्हाण, मालवण तालुका कृषी अधिकारी व्ही.जी.गोसावी, कृषी पर्यवेक्षक मालवण डी. डी. गावडे, कृषी पर्यवेक्षक धामापूर ए. जी. परब, आत्मा समन्वयक श्री एन. एम. गोसावी, कृषी सहाय्यक नांदरूख श्रीम एस. व्ही. चौखंडे तसेच कोकण रत्न शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री विलास चव्हाण व विभागीय व्यवस्थापक श्री रमाकांत सातार्डेकर तसेच आंबेरी, ना़दरुख, कातवड, देवली , चौके गावातील शेतकरी व महिला उपस्थीत होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स