ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांना राज्यस्तरीय 'समाजरत्न कोकणगौरव पुरस्कार ' प्रदान..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांना राज्यस्तरीय 'समाजरत्न कोकणगौरव पुरस्कार ' प्रदान..!

प्रकाशन: 13 Oct 2022 12:40 PM
वाचन संख्या 20

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास सखाराम पाताडे यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत “हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड” यांनी -२०२२ चा राज्यस्तरीय आठवा” समाजरत्न कोकणगौरव पुरस्कार ” देवून सन्मानित केले आहे .
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक .09.10.2022 रोजी लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह , चिपळूण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
विस्तार अधिकारी सुहास पाताडे हे जिल्ह्यातील उपक्रमशील अधिकारी म्हणून परिचित आहेत.तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे हे अनोख्या शैलीने करीत आसलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी,शिक्षक आणि पालकप्रिय आहेत. ते कासार्डे गावचे सुपुत्र असून त्यांना यापुर्वीही अनेक तालुका जिल्हा राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स