ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगड येथे सेल्फी पॉईंटचे आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते लोकार्पण...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवगड येथे सेल्फी पॉईंटचे आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते लोकार्पण...!

प्रकाशन: 13 Oct 2022 10:20 AM
वाचन संख्या 72

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात देवगड बस स्थानक समोर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण आज गुरुवार १३ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे. सेल्फी पॉईंटने देवगडच्या पर्यटन सौंदर्यात भर पडणार आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्या माध्यमातून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे, उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना नेते अतुलराव राणे, संदेश पारकर, सतीश सावंत शिवसेना उपनेते तथा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग युवासेना अधिकारी सुशांत नाईक, महीला जिल्हा संघटीका निलम सावंत-पालव, देवगड जामसंडे नगराध्यक्ष साक्षी प्रभू , नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, नगरसेवक विशाल मांजरेकर, नगरसेवक संतोष तारी आदींसह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित राहणार आहेत,
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स