'शरद चांदण्याने' कट्टा नगरी संगीतमय..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
बॅ .नाथ पै सेवांगण कट्टा येथे कोजागरी निमित्त “शरदाचे चांदणे ” या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अर्जून पेंडूरकर यांच्या आदर्श कट्टा निर्मित व स्वरनिनाद कट्टा यांच्या वतीने सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,बगळ्यांची माळ फुले,सखी मंद झाल्या तारका,सांज ये गोकुळी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी,कितीदा नव्याने तुला आठवावे,नभ भरले आदी भावगीतानी मैफिल
उत्तरोत्तर रंगत गेली. प्रितम गुराम, रवीना पांजरी, ऋषिकेश चव्हाण, स्वरा पेंडूरकर, रेश्मा यानी ही भावगीते सादर केली.
संगीत साथ अर्जून पेंडूरकर,भगवान काळसेकर, युवराज चव्हाण,प्रतिक कातिवडेकर, अरविंद वराडकर,ओंकार कासकर यानी दिली.
वैष्णवी लाड यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास अदिती शृंगारे, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, बाळ वाईरकर, सुनील गुराम, हरेश चव्हाण, गोसावी सर, प्रियांका भोगटे, सौ झाटये, अरविंद पेंडूरकर
तसेच संगीत प्रेमी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)