ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अवैध वाळू वाहतूकीचे बेछूट डंपर थांबले नाहीत तर मनसे नेरुरपार पुलावर आंदोलन करणार : मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अवैध वाळू वाहतूकीचे बेछूट डंपर थांबले नाहीत तर मनसे नेरुरपार पुलावर आंदोलन करणार : मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव

प्रकाशन: 09 Oct 2022 10:33 PM
वाचन संख्या 186

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक आणि बेछूट डंपरविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मालवण | प्रतिनिधी : मालवण मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक आणि बेछूट डंपरविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिलेल्या इशारा वजा संदेशानुसार तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन हे पर्यावरणासाठी घातक आहेच शिवाय जिल्ह्याचा वैध मार्गाने येणारा महसूलही बुडत आहे. ही वाळू वाहतूक करणारे परराज्यातील पासिंगचे डंपर ही नागरीक व इतर रहदारीसाठी एक मोठी समस्या असल्याचे सांगितले आहे. मालवण ते कुडाळ मार्गावरील सामान्य नागरीक जीव मुठीत धरुन प्रवास करत आहेत . हल्लीच सागरी महामार्गावर एका पाळीव जनावाराचाही अंत झाल्याचा दाखला त्यांनी दिला आहे.

तालुक्यातील हडी,कालावल,बांदिवडे,आंबेरी इथून हे अवैध वाळू उत्खनन होते. त्यानंतर संध्याकाळनंतर संपूर्ण रात्रभर हीच वाळू वाहतूक करणारे डंपर एकामागोमाग एक सुसाट वेगाने सुटतात. याबाबत मनसेने नुकत्याच झालेल्या एस.टी. व डंपर अपघाताबाबत वाचा फोडली परंतु ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण जनतेसमोर सत्य व तत्थ्य मनसे लवकरच पुराव्यानिशी व कायदेशीर मार्गाने सिद्ध करेलच असे प्रतिपादन मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले आहे.
या सर्व गोष्टी तहसीलदार व इतर प्रशासनाच्या देखत घडत असल्याचाही आरोप मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केला आहे. यासंबंधी वारंवार इशारे देऊनही हे अवैध प्रकार थांबत नसल्याने आता मनसे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मनसे थेट नेरुरपार पुलावर अशा वाहनांबद्दल आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिला आहे.

मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी दिलेल्या इशारा वजा संदेशानुसार तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन हे पर्यावरणासाठी घातक आहेच शिवाय जिल्ह्याचा वैध मार्गाने येणारा महसूलही बुडत आहे. ही वाळू वाहतूक करणारे परराज्यातील पासिंगचे डंपर ही नागरीक व इतर रहदारीसाठी एक मोठी समस्या असल्याचे सांगितले आहे. मालवण ते कुडाळ मार्गावरील सामान्य नागरीक जीव मुठीत धरुन प्रवास करत आहेत . हल्लीच सागरी महामार्गावर एका पाळीव जनावाराचाही अंत झाल्याचा दाखला त्यांनी दिला आहे.

तालुक्यातील हडी,कालावल,बांदिवडे,आंबेरी इथून हे अवैध वाळू उत्खनन होते. त्यानंतर संध्याकाळनंतर संपूर्ण रात्रभर हीच वाळू वाहतूक करणारे डंपर एकामागोमाग एक सुसाट वेगाने सुटतात. याबाबत मनसेने नुकत्याच झालेल्या एस.टी. व डंपर अपघाताबाबत वाचा फोडली परंतु ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण जनतेसमोर सत्य व तत्थ्य मनसे लवकरच पुराव्यानिशी व कायदेशीर मार्गाने सिद्ध करेलच असे प्रतिपादन मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी केले आहे.
या सर्व गोष्टी तहसीलदार व इतर प्रशासनाच्या देखत घडत असल्याचाही आरोप मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी केला आहे. यासंबंधी वारंवार इशारे देऊनही हे अवैध प्रकार थांबत नसल्याने आता मनसे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मनसे थेट नेरुरपार पुलावर अशा वाहनांबद्दल आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी दिला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स