ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माध्यमिक विद्यामंदिर साळशीचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांना गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते आंतरराज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान..!

माध्यमिक विद्यामंदिर साळशीचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांना गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते आंतरराज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान..!

प्रकाशन: 09 Oct 2022 02:15 PM
वाचन संख्या 188

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
बेळगाव येथे ८ ऑक्टोंबर रोजी संपन्न झालेल्या आंतरराज्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशी चे मुख्याध्यापक माणिक शंकर वंजारे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगाव व हेल्थ अँड नेचर डेव्हलमेंट सोसायटी, बेळगाव (रजि. कर्नाटक राज्य सरकार व भारत सरकार) यांच्या तर्फे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांमधून आदर्श मुख्याध्यापक आंतरराज्य गौरव पुरस्कार या पुरस्कारांने गौरवण्यात आले.
सदरचे पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर- बेळगाव चे खासदार बॅ.अमरसिंह पाटील , श्री.राजू शिंगाडे साहेब-मा.महापौर- कोल्हापूर महानगरपालिका, श्री.निलेश लंके -आमदार,व इतर मान्यवर यांच्या हस्ते व उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कारामध्ये अभिनंदन पत्र, सन्मान पत्र, स्मृती चिन्ह, म्हैसूर फेटा व चंदन हार यांचा समावेश होता.
माध्यमिक विद्यामंदिर साळशी च्या माणिक वंजारे सरांच्या या दैदिप्यमान व कर्तृत्ववान कार्यासाठी त्यांच्या परिवाराने, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत ,साळशी ग्रामविकास मंडळाचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक व विद्यार्थी या सर्वांनी सरांच्या या दैदिप्यमान कामगिरी बद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या भविष्यातील पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स